Ad will apear here
Next
जाणून घेऊ या प्राणायाम : भ्रामरी प्राणायाम


भ्रामरी प्राणायाम :
या श्वसनाच्या तंत्राचे नाव भ्रमर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय काळ्या भुंग्यावरून पडले आहे. हा प्राणायाम करत असताना उच्छवासाचा आवाज हा भुंग्याच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणगुणण्याप्रमाणे असतो, यावरून त्याचे असे नाव का पडले हे लक्षात येते. मनाची चलबिचल, निराशा, काळजी आणि क्रोधापासून सुटका मिळवण्याकरिता हा श्वसनाचा एक सर्वोत्तम  व्यायाम आहे. 

असा करावा हा प्राणायाम : 
एका शांत, हवेशीर कोपऱ्यात डोळे बंद करून ताठ बसावे. मन प्रसन्न असावे. दोन्ही हातांच्या तर्जनी दोन्ही कानांवर ठेवाव्यात. एक दीर्घ श्वास घ्यावा आणि श्वास सोडताना, कानावरील बोटांवर किंचित दाब द्यावा आणि भुंग्याचा तार स्वरात आवाज काढावा. ही क्रिया पुन्हा पुन्हा करावी. डोळे थोड्या वेळासाठी बंद ठेवावेत. शरीराच्या आत जाणवणाऱ्या अनुभूतीचे आणि शांततेचे निरीक्षण करावे. भ्रामरी प्राणायामाचा सराव झोपून किंवा उजव्या कुशीवर झोपूनही करता येऊ शकतो. झोपून प्राणायामाचा सराव करत असताना, केवळ भुणभुणण्याचा आवाज करावा दिवसातून तीन ते चार वेळेस हा प्राणायाम करता येऊ शकेल. प्राणायाम करताना हाताची बोटे (हाताची स्थिती) षण्मुख मुद्रेमध्येसुद्धा ठेवता येते. षण्मुख मुद्रेमध्ये बसण्यासाठी हाताचे अंगठे हळुवारपणे कानाच्या कुर्चावर ठेवून दोन्ही तर्जनी कपाळावर भुवयांच्या वर, मधली बोटे डोळ्यांवर, अनामिका नाकपुड्यांवर आणि करंगळी ओठांच्या कोपऱ्यांवर ठेवावी.

घ्यावयाची काळजी : 
बोट कानात न घालता कानाच्या कुर्चावर ठेवत आहात याची नीट खात्री करावी. कुर्चाला जोरात दाबू नये. बोटाने हळुवार दाब द्यावा आणि सोडावा. भुणभुणण्याचा आवाज काढत असताना तोंड पूर्णपणे बंद ठेवावे. हा प्राणायाम रिकाम्या पोटीच करावा. 

प्राणायामाचे फायदे : 
भ्रामरी प्राणायामाच्या नियमित करण्याने मानसिक ताण, संताप आणि अस्वस्थता यांपासून सुटका होण्यास मदत मिळेत. उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या लोकांसाठी हा प्राणायाम अतिशय परिणामकारक आहे. गरमी जाणवत असल्यास किंवा डोकेदुखी होत असेल, तर यामुळे त्यापासून आराम मिळतो. अर्धशिशी सुसह्य करण्यात मदत करते. या प्राणायामामुळे एकाग्रता आणि स्मरणशक्तीही सुधारते. आत्मविश्वास निर्माण होतो. रक्तदाब कमी करण्यात मदत होते. 

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZLTCK
Similar Posts
जाणून घेऊ या प्राणायाम : कपालभाती कपालभाती प्राणायाम : कपाल म्हणजे कपाळ; भाती म्हणजे तेजस्वी किंवा ओजस्वी. म्हणजेच कपालभाती म्हणजे तेजस्वी कपाळ. कपालभाती हा प्राणायाम करताना शरीरातील सर्व संस्थांची सफाई म्हणजेच प्रक्षालन होते. ओजस्वी कपाळ हे उत्तम आरोग्याचे प्रतिक म्हणता येईल. ही अशी प्रक्रिया आहे, ज्यामुळे केवळ वजन कमी होते, असे नाही, तर संपूर्ण शरीर संतुलित राहते
जाणून घेऊ या प्राणायाम : नाडी शोधन प्राणायाम प्राणाचे किंवा श्वासाचे नियंत्रण करणे म्हणजे ‘प्राणायाम’. श्वासनियंत्रणाचे जास्तीत जास्त फायदे मिळावेत यासाठी प्राचीन योग्यांनी प्राणायामाचे अनेक प्रकार शोधले. योगसाधनेमध्ये प्राणायामांचा उपयोग शरीर आणि मनाच्या शुद्धीसाठी केला जातो. ध्यानाला सुरुवात करण्याची पूर्वतयारी म्हणूनदेखील हे प्राणायाम करतात
जाणून घेऊ या प्राणायाम : शीतली प्राणायाम शीतली : शीतली हा योगातील प्राणायामाचा एक प्रकार आहे. या प्राणायाममुळे शरीरात थंडावा निर्माण होतो. हा प्राणायाम वसंत आणि ग्रीष्म ऋतूत केल्यास त्याचा जास्त फायदा होतो. अधिक माहितीसाठी आणि व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
जाणून घेऊ या योगासने : चालन क्रिया सध्या संचारबंदी असल्याने अनेक जणांना भरपूर मोकळा वेळ हाताशी मिळाला आहे. या मोकळ्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी प्रत्येक जण वेगवेगळे काही उपक्रम करतो आहे. व्यायाम, योगासने, प्राणायाम करण्याची इच्छा असूनही, सुरुवात करण्याची सवड मिळत नसलेल्यांना ही सवय अंगी बाणवण्यासाठी हा कालावधी उपयोगात आणता येऊ शकेल. म्हणूनच

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language